प्रतिनिधि , बुलडाणा : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशपातळीवर विविध शेतकरी संघटनांचे गेल्या 12 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन सुरू आहे. तीनही कृषी सुधारणा कायदे मागे घ्या, शेतमालास किमान आधारभूत मूल्य लागू असलेला कायदा करा आदी रास्त मागण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दिनांक 8 डिसेंबर 20 मंगळवार रोजी भारत बंद चे आवाहन केले आहे. या भारत बंदला बुलडाण्यातील मलकापूर ईथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत रेल्वे रोको आंदोलनाला सुरुवात झालीय.यावेळी मद्रास-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ला अडवण्यात आलेय..
