प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हिमायतबाग परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांमध्ये गुन्हा निष्पन्न करून आरोपीला अटक केले आहे. सांगळे कॉलनी येथील सुधाकर नारायण चिकटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता सुधाकर चिकटे त्यांची पत्नी आशा , मेहुना राजेश संतोष मोळवंडे त्यांची बायको अलका आणि मेहुण्याचा मुलगा युवराज या चौघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर गुन्हे शाखेने या चौघांना अटक केले आहे.मृत नारायण चिकटे हे बस चालक होते ते नेहमी दारू पिण्यासाठी आपली पत्नी आशा यांच्याकडे पैशाची मागणी करत असे तसेच तिला वेळोवेळी त्रासही देत असे त्यामुळे आशा या त्यांच्या सवयीला कंटाळल्या होत्या. अशा या गिरणी चालून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. परंतु, नवऱ्याचा त्रास असाह्य झाल्यानंतर त्याच बिल्डिंगमध्ये वर राहणारे त्यांचे भाऊ राजेश संतोष मोळवडे त्यांची बायको अलका आणि भाचा युवराज यांच्या मदतीने नारायण चिकटे यांच्या डोक्यात लोखंडी रॅडने वार करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहास एका गोणीत बांधून हिमायतबाग परिसरात नेऊन त्यांना जाळले असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.
