जनतेज न्युज

भुसावळ येथे आयशर च्या धडकेने पती-पत्नीचा जाग्यावर मृत्यू

प्रतिनिधी , भुसावळ ॲकर:-भुसावळ येथे हायवेवर खडकाळ चौफुलीवर आयशर ने जोरदार धडक दिल्याने टू व्हीलर वरील पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला आहे बुलढाणा येथील चंद्रकांत जगन्नाथ वराडे व संध्या चंद्रकांत वराडे या भुसावळ येथील गडकरी हॉल ला लग्नासाठी येत होते आज सकाळी साडेआठ वाजता खडका चौफुली जवळ आयशर ने जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला आहे या ठिकाणची पाहणी भुसावळच्या दिवाळी एस पी वाघचौरे यांनी केली आहे आयशर पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले आहे