प्रतिनिधी , हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने कागल विधानसभा मतदारसंघामध्ये शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत महापुरुषांचा एकेरी उल्लेख करून जाणीवपूर्वक अपमान केला असल्याचा आरोप आजरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची तसेच तसेच मंत्री मुश्रीफ यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे .
