जनतेज न्युज

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाची अवकाशात झेप

प्रतिनिधी , औरंगाबाद : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारा आयोजित स्पेस रिसर्च २०२१ साठी तयार केलेल्या उपग्रह रविवारी अवकाशात झेपावला. हा उपग्रह रामेश्वर येथून बलून द्वारे अवकाशात सोडण्यात आला आहे. त्याचे थेट प्रक्षेपण औरंगाबाद महापालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा नगर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले.
यामध्ये देशातील १०० विद्यार्थ्यांचा समावेश असून औरंगाबाद महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च या फाऊंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनीषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. उपक्रमात सहभागी होण्यासाठी महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे, शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे यांनी विद्यार्थी तसेच शाळांना सहकार्य केले होते. यावेळी इंद्रानगरच्या शाळेत प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे, संस्कृती अधिकारी संजीव सोनार, रेशमी होमुंटे, सुरेखा महाजन यांची उपस्थिती होती.