प्रतिनिधी, जालना : औरंगाबाद शरातील एन 12 परिसरातील मेघावाले मंगल कार्यालयाच्या परिसरात मनोज शेषराव आव्हाड या तरुणाला अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याच्या निषेदार्थ, जालन्यात ही आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जालना जिल्हा न्यायालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपी विरुद्ध जलदगती न्यालायत हा खटला चालून या आरोपीना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करण्यात आली, या वेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली.
