प्रतिनिधी, जळगाव : जळगाव अँकर-मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळण्यासाठी सदैव काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाच्या पाठीशी उभा असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांनी दिले आहे
खासदार संभाजी राजे हे 26 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर ती मराठा आरक्षण व विविध मुद्द्यांवर ती आमरण उपोषणाला बसणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील म्हणाले की पंतप्रधान व केंद्र सरकारने योग्य ती भूमिका मराठा आरक्षणावर ती घेतली नसल्या कारणामुळे ही वेळ आली आहे ज्या ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी गरज लागेल त्याच्या ठिकाणी काँग्रेस मराठा समाजाच्या पाठीशी राहील अशी प्रतिक्रिया डॉक्टर उल्हास पाटील यांनी दिली आहे
