जनतेज न्युज

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या बेंचेसवरील आ.कृष्णा खोपडे यांचे नाव पुसल्याने अधिकाऱ्यांवर आरोप

प्रतिनिधी, नागपूर : पूर्व नागपूरात शांतीनगर, प्रेमनगर आणि इतर अनेक वस्त्यांमधील बेंचेसवर आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव लिहिले होते. कारण हे बेंचेस खोपडे यांच्या विकास निधीतून देण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपासून महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार त्या बेंचेसवरील कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून त्यावर आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्याचे काम पेंटरच्या सहाय्याने सुरू होते.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शांतीनगर आणि प्रेमनगर भागातील जुन्या बेंचेसवर स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून 2022 च्या योजनेप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यास सांगितले. त्यानुसार कालपासून त्यांनी कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून त्यावर अभिजित वंजारी यांचे नाव पेंटर लिहत होता.काही नागरिकांच्या लक्षात आले त्यानंतर नागरिकांनी ही माहिती आमदार कृष्णा खोपडे यांना दिली.काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हा प्रयत्न असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. सोबतच भ्रष्ट अधिकारी वर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ही केली.