प्रतिनिधी , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण न्हावा शेवा टप्पा 3 मधील पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमा प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्किल टोलेबाजी केलेय. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये प्रदूषणाची पातळी खालावली असताना हिमाचल मधून हिमालय दिसत होते त्यावेळी मी गच्चीवर जाऊन दिल्ली दिसते का हे पाहत होतो. यावेळी उपस्थित खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे यांना तुम्ही दिल्लीत असता तिथे काय करता हे पाहण्यासाठी दिल्लीवर लक्ष ठेवावेच लागेल अशी मिश्किल फटकेबाजी केली. तर आता सुरू असलेल्या विकास कामाबद्दल बोलताना सध्या मंगळावर पाणी असल्याचे शोधून काढण्यात आलेय पण त्याचा आपल्याला काहीच उपयोग नसून या विकासाच्या दिशेने जाण्यापेक्षा आपण जमिनीवरचा मूलभूत विकासाकडे लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेय.
