जनतेज न्युज

महावितरण नंतर धुळे महानगर पालिका करणार सक्तीची वसुली. मालमत्ता कर वसुलीसाठी पथके स्थापन करणार…

प्रतिनिधी , धुळे : आधीच महावितरणच्या सक्तवसुली मुळे नागरिक हैराण झाले आहेत त्यातच आता धुळे महानगरपालिका मालमत्ता कर वसुली करणार असून यामुळे धुळेकर जनतेला मोठ्या प्रमाणावर कर भरण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सक्तीचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहेत.
गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या वतीने परिस्थितीचं गांभीर्य समजून शहरातील प्रॉपर्टी धारकांना मालमत्ता वसुली सक्तीची न करता कर भरण्यासाठी आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे आदेशाप्रमाणे वसुली होऊ शकली नाही मात्र यावर्षी जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी आयुक्त उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वसुली पथकांची स्थापना करणार असून ज्या कर धारकांवर मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे अशांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आदेश धुळे महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी दिले आहेत. म्हणून नागरिकांनी त्वरित आपल्या मालमत्तांचे कर भरावेत व धुळे महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.