राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य सरकारला मिळालेल्या निधीचा वापर शेतकऱ्यांना शेडनेट सवलतीच्या दरात देण्यासाठी व्हावा, यासाठी मी केंद्र सरकारशी चर्चा करणार :- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
प्रतिनिधी , सांगली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य सरकारला मिळालेल्या निधीतुन काही रक्कम ही शेतकऱ्यांना शेडनेट सवलतीच्या दरात देण्यासाठी व्हावा, यासाठी मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील खांजोडवाडी येथील डाळिंब बागेची पाहणीचा करून शेतकऱ्यांशी संवाद सादला. यावेळी पवार हे बोलत होते.
शेतकरी उत्पादन दर्जेदार घेत आहेत मात्र त्या बरोबरच त्या शेती पिकाच मार्केटिंग प्रभावीपणे कस करायच या बाबत प्रयत्न सुरू आहेत, अस सांगून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पुढे म्हणाले, अनेक वर्षा पूर्वी आम्ही फळबागांचा समावेश रोजगार हमी मध्ये समावेश केला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. जिथं कमी पाऊस आहे, तिथं ऊस लावला की ते शेतकरी अडचणीत येतात, त्यामुळे कमी पाणी असलेल्या ठिकाणी ऊसा ऐवजी, डाळिंब सारखी ज्यास्त उत्पादन देणारी पीक घ्यावी. ज्यांनी हा प्रयोग केला ते शेतकरी यशस्वी झाले अस ही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितलं.
प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत खांजोडवाडी या गावातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम डाळींबाचे भरघोस उत्पादन घेतलं आहे. एकीकडे लोकडाऊन मुळे शेतकरी अडचणीत आले होते. तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळं राज्यातील अनेक डाळिंब बागांना फटका बसला आहे, मात्र खांजोडवाडी येथील शेतकऱ्यांना निर्यातीक्षम डाळिंब तयार केली आहेत.
विमा कंपनी यांच्या अटी ह्या त्या कँपन्यांच्या सोईच्या आहेत, शेतकऱ्यांच्या सोईच्या नाहीत. त्यामुळे ज्यास्त पावसाने नुकसान होऊन सुद्धा शेयकर्यांना विमाचा मोबदला मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही विम्याच्या त्या अटी आणि निकष बदलण्याच्या प्रयत्नात आहोत, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली
