जनतेज न्युज

‘मानवतेचा शत्रू असलेल्या पाकिस्तानी विषाणूलाही कोरोनाप्रमाणेच संपवावे लागेल!’ – शिवसेना

प्रतिनिधी , मुंबई : रविवारी ५ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी दोन जवान शहीद झाले आहे. तर, या चकमकीत ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्थान मात्र दहशतवादी कारवाया सोडायला तयार नाही. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेने आजच्या सामनातील अग्रलेखात पाकिस्तानचा समाचार घेतला आहे. संपूर्ण जगावर चालून आलेल्या कोरोनाच्या संकटापासून मानव जातीचे रक्षण कसे करायचे या एकाच विषयाची चिंता अवघे जग वाहत असताना पाकिस्तानला मात्र याची कुठलीच फिकीर पडलेली दिसत नाही. कोरोनाच्या वैश्विक संकटातही युद्धबंदी मोडून दहशतवाद आणि घुसखोरीचे हत्यार उपसणाऱ्या पाकिस्तानच्या विकृत मानसिकतेला हिंदुस्थानी जवानांनी चांगला धडा शिकवला. 24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा हा स्कोअर उत्तम असला तरी मानवतेचा शत्रू असलेल्या पाकिस्तानी विषाणूलाही कोरोनाप्रमाणेच संपवावे लागेल! असे शिवसेनेनं म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.