जनतेज न्युज

मालेगांव आजपासून आठवडाभर यंत्रमागची खटखट राहणार बंद…. सुताचे वाढते भाव व कापडाची कमी झालेली मागणी यासाठी सर्व संघटना मिळुन पावरलूम बंद…

प्रतिनिधी , मालेगांव : मालेगाव शहराची आर्थिक घडी बसविणारी तसेच लाईफलाईन असलेल्या पॉवरलूम आजपासून एक आठवडाभर बंद करण्यात आल्या असुन सुताचे वाढलेले भाव व कपड्याची घटलेली मागणी यामुळे मालेगाव शहरातील सर्वच संघटना मिळुन 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या संपुर्ण आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन पॉवरलूम मधील मंदीचा फटका बघता सर्व संघटना मिळून हा बंद पुकारण्यात आला आहे.गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा यंत्रमाग बंद करण्याची वेळ या कारखानदारावर आली आहे.यातुन सरकारने काही मार्ग काढुन सुताचे भाव कमी करावे अशी मागणी कारखानदार करत आहेत….मालेगाव शहरात जवळपास अडीच लाखाच्या वर कारखाने असुन साडेचार ते पाच लाख या ठिकाणी काम करत असुन आठवडाभर त्यांना काम मिळणार नसल्याने कामगारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे….