प्रतिनिधी , मीरा भाईंदर : मीरा रोड पोलिसांनी शांती नगर परिसरातून दोन अनोळखी इसमाना अटक केली असून त्याच्या कडे २५ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शांती नगर परिसरातील एका जागृत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांती नगर परिसरात आज सकाळी ८ च्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका जागृत नागरिकाने पोलिसांना सांगितले,सदर ठिकाणी दोन अनोळखी इसम उभे आहेत त्यांच्यावर संशय येत आहेत,अशी माहिती पोलिसांना दिली.गस्तवर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी स्वप्नाली पालांडे त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनी या दोन संशयित इसमाना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे दोन मोठ्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचं आढळून आले.पुढे तपासणी केली असता २५ किलो ४०० ग्रॅम इतका गांजा असल्याचं समोर आले आहे.यामध्ये आरोपी प्रदीप दुबे, संतोष पांडे अटक केली असून त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
