जनतेज न्युज

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे किरिट सोमय्यांकडून स्वागत..

प्रतिनिधी , मुंबई: अभिनेत्री कंगना रानावतच्या बांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करत असून मुंबईच्या महापौर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. या निर्णयामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांची बोलती बंद झालेली आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिली.