प्रतिनिधी, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे 14 दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आज आपल्या मतदारसंघात म्हणजेच कल्याण पूर्वेत आले होते यावेळेस पूर्वेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवसेना मध्यवर्ती शाखेत कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांसोबत घेतली बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी बंड का केला याविषयी कार्यकर्त्यांना दिली माहिती शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वायरल फोटो वाढदिवसा खासदार श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदा कल्याण पूर्व येथील शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांच्या कार्यालयात भेट दे तिथल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना सोबत चर्चा केली नंतर खासदार श्रीकांत शिंदे थेट कल्याण पूर्व येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेला भेट देत त्या परिसरातील पदाधिकारी नगरसेवक व इतर महिला युवा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी बंड का केला याविषयी दिली माहिती देत पुढे कशा पद्धतीने काम करायचे हे सांगितले.तर दुसरीकडे शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल होत असल्याने याबाबत बोलताना त्यांनी तो फोटो जुना असून वाढदिवसानिमित्त काढलेला फोटो कोणीतरी व्हायरल करत असल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा फोटो हा शरद पवार यांच्या वाढदिवसाचा फोटो आहे. आणि तो फोटो कोणीतरी वायरल करत आहे.त्याबद्दल त्यांनी स्पष्टिकरण दिले आहे.
