जनतेज न्युज

मुरुड जंजिरा आणि गोल घुमट कुलूप बंद असल्याने पर्यटकांची नाराजी…. ह्या ऐतिहासिक वास्तू खुली करावी स्थानिकांची मागणी… पुरातत्व खात्याने सुशोभीकरण करणे स्थानिकांची मागणी…..

प्रतिनिधी, मुरुड: शासनाने पर्यटनाला परवानगी दिली आहे मात्र अजूनही काही पर्यटन स्थळे मंदिरे गड किल्ले पर्यटनासाठी अजून ही खुली करण्यात आलेली नाहीत त्यात निसर्ग चक्री वादळ आणि परतीच्या पाऊसाने मुरुड मधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि आता पर्यटनाला सुरवात झाली खरी पण जंजिरा किल्ला बंद असल्याने मुरुड च्या नागरिकांनचा व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असल्याने किल्ला आणि गोल घुमट पर्यटनासाठी खुली करावीत अशी मागणी स्थानिक करीत आहेत तर दुसरीकडे ह्या ऐतिहासिक वास्तूंची पुरातत्व खात्याने डाग डूजी करून शूशोभीकरण करावी अशी ही मागणी स्थानिक करीत आहेत

व्हीओ – जंजिरा किल्ला आणि गोल घुमट ह्या दोन वास्तू ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. मुरूड – आगरदांडा रस्त्यावर ६ कि.मी. अंतरावर
खोकरी चे गुंबज ( गोल
घुमट ) आणि जंजिरा किल्ला ह्या वास्तुशास्राचा अजोड नमुना असुन सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे  हे शिल्प इतिहास प्रेमींचे आकर्षण आहे. भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना आहे. तर जंजिरा हा किल्ला समुद्रात बांधण्यात आला आहे तर दगडाचे बांधकाम असलेले इंडो – सारसेनिक पद्धतीत बांधलेले हे गुंबज आहेत. या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाण बद्धता पाहण्यासारखी आहे .
पुरातत्व खात्याचे अयोग्य व्यवस्थापनामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला आणि घुमटाची कलाकृती अजूनही काही ऐतिहासिक वास्तू बंद असल्याने कुंपणाबाहेरुनच पाहुन समाधान मानावे लागत आहे . पुरातत्व खात्याने या वास्तू ची डाग डूजी कराणे गरज आहे जंजिऱ्याची पार्श्वभूमी माहित असलेला प्रशिक्षित मार्गदर्शक इथे नेमल्यास इतिहासप्रेमींना वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकेल. या पुरातन ऐतिहासिक वास्तूची निगा पुरातन विभागाकडून केली जात नसल्याने ह्या वास्तू आहे त्याच स्थितीत आहेत. तर पर्यटकांसाठी कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. ह्या वास्तूंचे सुशोभीकरण व पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सेवा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे. तर सध्या पर्यटक मुरुड जंजिरा किल्ला आणि गोल घुमट पाहायला येतात मात्र ह्या दोन्ही वास्तू पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आलेल्या नसल्याने स्थानिक नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे