जनतेज न्युज

या सरकारला चर्चा करण्यात इंट्रेस्ट नाही – देवेंद्र फडणवीस.

प्रतिनिधी , सरकारने मांडलेल्या विधेयकांबाबत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की सरकारने आम्हाला कधीही विश्वास घेतलं नाही, या सरकारला चर्चा करण्यात इंट्रेस्ट नाही तर चर्चा न करताच कामकाज उरकून टाकायचं अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो कारशेड हा प्रकल्प आरेमध्ये करण्याची परवानगी दिली आहे आणि ते काम तिथेच झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडप्रकरणाबाबत बोलताना दिली आहे.