जनतेज न्युज

येथील टोलनाक्याजवळ दोन वाहनांवर विना परवानगी पिवळ्या मातीची वाहतूक करताना शिरपूर तहसिलदार आबा महाजन आणि धुळे खनिकर्म अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

शिरपूर धुळे: ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता शिरपूर टोलनाक्याजवळ पिवळ्या मातीची विना परवानगी अवैध वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन आणि धुळे खनिकर्म अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या पथकांनी सापळा रचून वाहन (जीजे १६, एक्स-९२०२) पकडले. त्यावर ३ ब्रास पिवळी मातीची अवैध वाहतूक मनोज बोरसे (रा. जनतानगर शिरपूर) याने तर दुसर्या वाहनावर (एए-१६९२
३.५० ब्रास मातीची अवैध वाहतूक रोहिदास बंजारा लौकी करतांना आढळून आला. या वाहनांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यासाठी शिरूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी हे वाहन शिरपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणाबाहेर जमा केली आहेत. यासोबतच करवंद शिवारातील अरुणावती नदी पात्रात भिका मराठे आणि मस्तान सोनवणे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये एमएच-१८, एच १५३) अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले. या ट्रॅक्टरमध्ये अर्धा ब्रास वाळूची वाहतूक चालक भुरा भिल करीत होता. तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या पथकाने देखील एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. शुक्रवारी दिवसभरात महसूल विभागाने एकूण ४ वाहनांना अवैध गौण खनिज तूक करताना पकडून मोठी कारवाई केली आहे.