जनतेज न्युज

रत्नागिरी येथील अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी

प्रतिनिधी , रत्नागिरी : रत्नागिरीतील(Ratnagiri) चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. कोकणातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी ही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पूरस्तिथी निर्माण झाली आहे.

आज सकाळपासूनच मुंबई(Mumbai), सह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग(Sindhudurg) जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती (सायक्लोनिक सक्र्युलेशन) दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.बावनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीच्या पाण्याची धोक्याची पातळी 11 मी इतकी आहे. पुलावरील वाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या वाहनांचा खोळंबा झाला आहे.