प्रतिनिधी, रत्नागिरी :ओबीसी समाजाच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून आज काँग्रेसने हल्लाबोल रँली काढलीय.रत्नागिरीतून या आंदोलनाला सुरुवात झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार माजी खासदार हुसेन दलवाई या रँलीत सहभागी झाले होते.केंद्र सरकारच्या इंपिरीअल डाटा न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचा राजकीय आणि सामाजिक आरक्षण कमी केलं सातत्याने राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र सरकारला ने डाटा देण्याची मागणी केली या सगळ्या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय सामाजिक आणि उद्याच्या काळात आरक्षणच कमी करायचे धोरण केंद्र सरकारने सुरू केलेला आहे याचं जनजागरणाची सुरुवात काँग्रेसने रत्नागिरीतून केलीय. सरकारच्या खासगीकरणामुळे सगळ्यात मोठा आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे केंद्र सरकारने सगळे सार्वजनिक उपक्रम विकायला सुरुवात केलीय.कोकण रेल्वे देखील विकायला काढलीय जर सार्वजनिक उपक्रम खाजगी झाले आरक्षण या माध्यमातून संपवण्याचा घाट नरेंद्र मोदीच्या राज्य सरकारने सुरू केला आहे त्यांच्या विरोधात जनजागरण मेळाव्याची सुरुवात रत्नागिरीतून काँग्रेसने केलीय.
