जनतेज न्युज

रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे धुळे मनपा समोर ठिय्या आंदोलन.

प्रतिनिधी , धुळे : रमाई घरकुल योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, तसेच धुळे मनापामध्ये हद्दवाढ करून समावेश झालेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरा पासून धुळे शहरातील सामाजिक न्याय भवनाजवळ बेमुदत उपोषण करणाऱ्या लाभार्थ्यांनी अनेक मार्गाने आंदोलन करून देखील मनपा प्रशासन त्यांच्या मागण्यांची दाखल घेत नव्हते. म्हणून आज धुळे महापालिकेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.
धुळे मनपा रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच धुळे मनपाच्या हद्दवाढ मध्ये समावेश झालेल्या गावांचा नमुना क्र.8 रमाई घरकुल योजनेच्या त्रुटी मध्ये ग्राह्य धरून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अश्या मागण्यांसाठी आज लाभार्थ्यांनी धुळे मनपाच्या आवरता ठिय्या आंदोलन केले. येणाऱ्या काळात जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी समितीचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर यांनी दिला. यावेळी हजारो लाभार्थ्यांसोबत समितीचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर, सागर धिवरे, मनी बाब खैरनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.