जनतेज न्युज

राज्य शासनाच्या आदेशानुसार साईमंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुल..

प्रतिनिधी , शिर्डी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभ दिनी राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर आज १६ नोव्हेंबरपासून साईमंदिराचे दरवाचे अखेर 8 महिन्यानंतर खुले झाले असून शिर्डीला साईदरबारी दर्शनासाठी एका दिवशी 6 हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असून आज मंदिर उघडल्यानंतर पाहिल्याचं दिवशी मंदिर परिसरात साईदर्शनासाठी भाविकांनी रागाचं रांगा लावल्या.त्याचबरोबर जगभरातुन येणाऱ्या साईभक्तांना दर्शनासाठी साई संस्थानच्या वतीने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था व स्थानिक नागरीकांसाठी टोकनची व्यवस्था करण्यात आली होती मात्र ऑनलाइन करण्यात आलेली व्यवस्था ही पहिल्याच दिवशी कोलमडून गेलेली बघायला मिळतंय.स्थानिक नागरिकांना टोकन देऊन साईदर्शन देण्याचा निर्णय साईसंस्थान प्रशासनाच्या वतीने करण्यात आल मात्र टोकन दर्शन पद्धत ही कोलमडून गेलेली आहे याबाबत स्थानिक परिसरातुन दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन व्यवस्थेबदल माहिती दिलीये.
साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले ,जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील ,खा.सदाशिव लोखंडे ,आ.राधाकृष्ण विखे पाटील ,तहसीलदार कुंदन हिरे ,प्रांताधिकारी गोविंद शिंदे ,मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तात्काळ बैठकीचे नियोजन करण्यात आले होते , मात्र काल झालेल्या बैठकीत ठरलेले नियमांचा फज्जा साईसंस्थानच्या आधिकारया कडून उडाला असून याबाबत शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे व माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्यावर आरोप केलेय.
साईदरबारात भक्तांच्या स्वागतासाठी साईमंदीरातील परीसरही फुलांनी सजविण्यात आला असून साईमंदिरातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी साईभक्तांच्या स्वागतासाठी तयार आहे.त्याचबरोबर साईदर्शनानंतर भाविकांना साईप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन साईसंस्थानच्या वतीने करण्यात आलं असून भक्तांनी कोविड-19 सुरक्षीतेसाठी सामाजिक अंतर व मास्क वापरून कोरोनापासून दुर राहण्याचे आवाहन करण्यात आल.