प्रतिनिधी, बुलडाणा : राज्यात पेरणीचे दिवस सुरू आहे. शेतकरी पेरणी मध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आले आहे. तर कुठे पाहिजेत ते खत उपलब्ध होत नाही. पीक कर्ज मिळत नाही. तर सत्तेसाठी सगळ्याच पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. असा आरोप रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा येथे केला आहे. Mपुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री आणि कोण मंत्री मंडळात याच्यात आम्हाला फारसा रस नाही. जो कोणी पदावर बसेल त्यांनी जबाबदारी समजून आपले काम केले पाहिजे. त्या खुर्चीची गरिमा ठेवली पाहिजे. ज्या सामान्य लोकांच्या भरवश्यावर आपण खुर्चीवर बसलो त्या लोकांना आधार दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
