जनतेज न्युज

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या प्रमुख मागण्यांचा साधा उल्लेखही नाही , सत्ताधारी लोकप्रतीनिधींनी याचा जाब द्यावा – आ राणाजगजितसिंह पाटील

प्रतिनिधी, उसमानाबाद : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण उस्मानाबाद -तुळजापुर -सोलापर रेल्वेमार्गासाठी आत्तापर्यंत  केंद्र सरकारने ३२ कोटी दिले मात्र राज्य सरकारने मागणी करून एक रुपयाही दिला नाही .परिवहन मंत्र्यांविरूध्द हक्कभंग दाखल केला आहे . कौंडगाव एमआयडीसी टेक्सटाईल पार्क बाबत उल्लेख नाही . राज्यात १०० खाटाचे माहिला रूग्णालय अनेक ठीकाणी दिले . दोन जिल्ह्यात श्रेणीवाढ दिली मात्र गरज असताना व प्रस्ताव असुन देखील उस्मानाबादच्या महिला रूग्णालयाचा उल्लेख झाला नाही . केवळ चालू प्रकल्पाचाच उल्लेख आला . या महत्वपुर्ण तीन विषयासाठी सत्ताधारी लोकप्रतीनिधींनी काय केले याचा जाब जनतेला द्यावा असे म्हणत वैद्यकिय महाविद्यालयासाठी ९४ कोटी मंजुर केल्याचे मलातरी अर्थसंकल्पात दिसले नसुन चार वैद्यक महाविद्यालयाच्या हेडवर ९ कोटी ४१ लाख मंजुर केल्याचे निदर्शनात आनुन देत आकडे हाजारात याकडे लक्ष वेधले .