प्रतिनिधी , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला व त्यांचा विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या विरोधात आज नवी मुंबई वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई भाजपच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली यावेळी राज्यात महिला सुरक्षित नसल्याचेही म्हंटले गेले.व महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.तसेच गृहमंत्री अनिल देखमुख यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी आंदोलक करीत होते.
