जनतेज न्युज

राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध कर्मचारी संघटनेने येत्या १५ व १६ मार्चला संप पुकारण्याचा निर्णय

प्रतिनिधी , पुणे – राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध कर्मचारी संघटनेने येत्या १५ व १६ मार्चला संप पुकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातही बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत खाजगीकरण थांबवण्याची मागणी केली.राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या (‘यूएफबीयू’) नेतृत्वाखाली . विविध नऊ बँक कर्मचारी, अधिकाºयांच्या संघटनांचे सदस्य दोन दिवसांच्या संपात सहभागी झाले आहेत.