प्रतिनिधी , मुंबई : संपूर्ण मुंबई मध्ये सध्या कोविड पेशंट करिता ऑक्सिजनची कमतरता आहेच सोबत कोविड रुग्णालयांत बेड देखील उपलब्ध नाहीत. अश्यावेळी मुंबईतील अंधेरी पूर्व विभागातील कोरोनग्रस्त रुग्णांना ज्यांना रुग्णालयांत बेड व ऑक्सीजन मिळत नाहीत अशा गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या घरी ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अंधेरीतील जीवन ज्योत प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री मुरजी पटेल काका ह्यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन सेवा अशा गंभीर रुग्णांना घरपोच देण्यात येत आहेत. या तत्काळ व घरपोच सेवेमुळे आज पर्यंत 100 हून अधिक लोकांचे जीव वाचवण्यात संस्थेला यश मिळाले आहे. श्री मुरजी पटेल काका यांना आज अंधेरीतील जनता “आॕक्सिजन मॕन” म्हणून आदराने संबोधताहेत.
