जनतेज न्युज

लग्नमंडपात पोलिस दाखल होताच वधू वरांची उडाली धांदल… कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधू-वर पित्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल…

प्रतिनिधी , बुलडाणा : संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात देखील कोरोनाची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शहरासह कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरत असताना नागरिक याचे गांभीर्य घेताना दिसत नाहीयेत..शासनाचे नियम धाब्यावर बसवून आजही जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नसमारंभ पार पडत आहेत, असाच एक प्रकार खामगाव तालुक्यातील चिखली खुर्द या ठिकाणी घडला आहे, पोलिसांनी या लग्नस्थळ भेट देतातच नातेवाईकांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांनी लग्नमंडपात अचानक भेट दिल्याने त्या लग्न समारंभामध्ये 25 नागरिकांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती या वेळी दिसून आली, यामुळे जलंब पोलिस ठाण्यात वधूपिता ओमकार किसन तांदळे वरपिता सुखदेव इंगळे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..