प्रतिनिधी , नांदेड : दिनांक.लॉकडाउनच्या बारा दिवसाच्या कालावधीत लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड अन्नपूर्णा तर्फे दररोज तीनशे लॉयन्सचे डबे वाटप करण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या हस्ते नांदेड रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना डबे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे .
गतवर्षी लॉक डाऊन मध्ये सतत बावन दिवस बत्तीस हजारापेक्षा जास्त लॉयन्सचे डबे वितरीत करण्यात आले होते. यावर्षी बारा दिवसात छत्तीसशे डबे वितरित करण्याचा संकल्प लॉयन्स परिवारातर्फे करण्यात आला आहे.महेश भगवंतराव पाटील व ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रत्येकी तिनशे डबे,चंद्रकांत गंजेवार यांनी दोनशे,मारुती कदम सोनखेड यांनी शंभर,डॉ. अर्चना झाडबुके,क्षमा करजगावकर यांनी प्रत्येकी पन्नास डबे दिले आहेत.कै.सुधाकरराव गंगाधरराव जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्रीमती शामला सुधाकरराव जोशी यांच्यातर्फे तीस मार्च रोजी पन्नास डबे वाटप करण्यात येणार आहेत
