जनतेज न्युज

लेबर कॉलनी वासियांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे – संजय केनेकर भाजप शहराध्यक्ष

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील भाग्यनगर येथील पत्रकार भवन येथे भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी संदर्भात राज्य शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून यात राज्य शासनाची आणि विभागीय आयुक्तांची चूक असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे. राज्यातील अनेक लेबर कॉलनी या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरती करण्यात आले असून तेथील घरे कर्मचाऱ्यांना देण्यात आली मात्र औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी संदर्भात राज्य शासनाने एकदम चुकीचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात राज्य शासनाने आपली चूक सुधारून लेबर कॉलनी तील घरे ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरती करून देण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व लेबर कॉलनी ह्या म्हाडाच्या माध्यमातून बांधण्यात आले असून.सदरील नियमाने या सर्व जागा लेबर कॉलनीतील रहिवासी यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महा विकास आघाडी सरकार औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतील नागरिकांसोबत अन्याय करीत असल्याचाही आरोप त्यांनी आज रोजी केला आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली असून त्या अनुसार संपूर्ण भारतात एकच कायदा असून मात्र महा विकास आघाडी सरकारने राज्यात काही ठिकाणी लेबर कॉलनी तील घरे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरती केली मात्र औरंगाबाद येथील घरे नावावर ती करण्यात आले नाही हा कुठला कायदा असल्याचा आरोप त्यांनी आज रोजी केला आहे,.सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे.