आम आदमी पार्टीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष सय्यद एम. अली यांची मागणी
प्रतिनिधी , पुणे :आम्ही वीज बिल भरणार नाही , लॉकडाऊनमुळे खिसा झाला साफ , आता तरी करा वीज बिल माफ करा , वचन पूर्ण करा, वीजबिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सय्यद एम. अली यांनी केली आहे .आम्ही पुणेकरांनी केंद्र व राज्य सरकारचे कर्फ्यु, लॉकडाउन असे सर्व आदेश पाळले. सरकारने आम्हाला काय दिले गमावलेली नोकरी, रोजंदारी, अवाच्या सवा शाळा फी, पेट्रोल दरवाढ, विजबिल इत्यादी. लॉकडाऊन कालावधीत आपण वीज बिल माफ करा ,जर वीज बिल माफ केले नाही तर लोक येत्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवतील . लॉकडाऊन कालावधी दरम्यान आम्ही वीज बिल माफ करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली .
यावेळी मनोज थोरात , मोनिका मोरस , फिलिप्स डिसोझा , साजिद कुरेशी , वसंत हराळे आदी उपस्थित होते .
