प्रतिनिधी , अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या नांदगाव पेठ या टोलनाक्यावर वरून जाणाऱ्या वरुड-मोर्शी मधील वाहनाना टोल मध्ये आजपासून ७५% टक्के सवलत देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.नांदगाव पेठ टोलनाक्यावर वरुड-मोर्शी मधील नागरिकांना टोल माफ करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.त्याचं पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वरुड-मोर्शी मार्गावरील वाहनांना टोल मध्ये ७५% टक्के सूट दिली असल्याची माहिती ट्विट द्वारे केली आहे तर त्यांनी याबाबत पत्र देखील काढले आहे,त्यामुळे वाहनांना दिलासा मिळाला आहे..
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून नांदगाव पेठ येथे आय आर बी कंपनीचा टोल नाका आहे.या टोल नाक्यावर नागपूर सह वरुड मोर्शी भागातून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे.मात्र वरुड मोर्शी कडील नागरिकांना या महामार्गावरून केवळ ८-९ किलोमीटर प्रवासाठी पूर्ण टोल भरावा लागत असल्याने टोल माफ करावा अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.त्यासाठी टोलमुक्ती कृती समिती यांनी आंदोलन केले होते.
