जनतेज न्युज

वानाडोंगरी नगरपरिषदेने केला कोरोना काळातच घणकचरा संकलन कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द.

प्रतिनिधी , नागपूर : नागपूर वानाडोंगरी नगरपरिषदेने केला कोरोना काळातच घणकचरा संकलन कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द,आता विभागीय कार्यालय करणार चौकशी
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जीवावर उदार होऊन सफाई कामगारांनी आपले कर्तव्य बजावले पण नागपूरला लागूनच असलेल्या वानाडोंगरी नगरपरिषदेच्या कोरोना काळातच घनकचरा संकलनाचे कार्य करणाऱ्या असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला आहे सोबतच या सर्व प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्याना आपल्या कामाला मुकावे लागत असून या संदर्भात आता विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे आणि आता यावर चौकशी सुद्धा करण्यात येत आहे पण सध्यातरी या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारातच आहे