जनतेज न्युज

वाय मराठी चित्रपट 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार 15 जून रोजी औरंगाबाद शहरातील जालना रोड एका हॉटेलच्या सभागृहांमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की,वाय हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये मुक्ता बर्वे नंदू माधव प्राजक्ता माळी अजित वाडीकर यांच्यासह शहरातील कलावंतांच्या भूमिका असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सदरील चित्रपट सस्पेन्स आणि डीलर असून हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आव्हान औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ दिग्दर्शक व कलावंत नंदू माधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मुक्ता बर्वे प्राजक्ता माळी यांच्या अभिनय असलेला हा चित्रपट अत्यंत रहस्यमय कथेवर ती असून या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे इफेक्ट आणि म्युझिक करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. सदरील चित्रपट हा 24 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सदरील माहिती आज रोजी देण्यात आली आहे.