जनतेज न्युज

वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा दहा दिवसात दंड न भरल्यास कारवाई

प्रतिनिधी , इलेकट्रोनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून वाहतूक पोलिसांनी या वर्षभरात जवळपास २२ करोड रुपयांचे चलन फाडले ,त्यातही जवळपास १३ करोड रुपयांची वसुली झाली नसून आता दंडाची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी चालकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दंड न भरल्यास १ डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येईल. गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा असला तरी दंडाची रक्कम वसूल होत नाही. कारण, वाहन चालक दंडच भरत नाही. थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याचे कळते. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या दहा दिवसामध्ये प्रलंबित असलेले ई चलानची रक्कम भरण्याची मुदत चालकांना देण्यात येत आहे. अन्यथा १ डिसेंबरनंतर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांवर केसेस करण्यात येतील. ही कारवाई करत असताना मोटार वाहन कायदा कलम २०७ अन्वये गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तसेच गाडी परवाना निलंबनाची कारवाई होईल. या कारवाईने नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुदतीत नागरिकांनी दंडाची थकीत रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे…. करोनामुळे पोलिसांनी ही दंडाची रक्कम वसूल केली नाही परंतु आता मात्र वाहतूक पोलिसांनी १० दिवसाचे अल्टिमेटमच दिले आहे … आता वाहतूक पिलिसांकडून पेंडिंग ई चलान चे संपूर्ण वसुली करण्यात येणार आहे. तसेच सेवा रस्त्यावर होत असलेल्या पार्किंग वर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले