जनतेज न्युज

विदर्भात होणार थंडी च पुनरागमन

प्रतिनिधी , तीन ते चार दिवसात विदर्भात होणार थंडी च पुनरागमन …यावर्षी संपूर्ण विदर्भात अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही,आता तर तापमान सामान्य पेक्षा ८ अंश सेल्सिअस अधिक झाल्याने विदर्भात दिवसाच्या वेळी उकाडा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने आज अकोला आणि नागपूरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत,त्यामुळे थंडी कमी झाली असली तरी पुढील तीन दिवसात निर्माण झालेली अँटी सायक्लोनिक परिस्थितीमध्ये बदल होणार आहे,त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थंडीचे पुनरागमन होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मध्य भारत,मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये अँटी सायक्लोनिक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे थंड हवा येणे थांबले असल्याने दक्षिणेकडील वारा बंगालच्या खाडीकडून मॉसचर घेऊन येत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ आणि शेजारच्या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे आज सकाळी काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. अशीच परिस्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याने पावसाची शक्यता असल्याची माहिती एम एल साहू यांनी दिली आहे.