प्रतिनिधी , पुणे : मागासवर्गीय महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती द्यावी तसेच आस्वासित योजनेअंतर्गत वेतनश्रेणी देण्यात यावी .शासकीय कार्यालयातील सर्व्हर प्रभावी द्यावेत ,कै. रवींद्र देखणे यांच्या मृत्यस जबाबदार वाय. सी.एम.प्रशासनावर कारवाई करावी या प्रमुख मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्त्व रिपाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई आठवले व रिपाइं श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विष्णु भोसले यांनी केले होते.यावेळी यांनी आठ दिवसात मागण्या मान्य झाल्यास अधिक तीव्र व आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ तीव्र घोषणा देण्यात आल्या . या आंदोलनात संगीताताई आठवले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,विष्णू भोसले जिल्हाध्यक्ष ,हरिष भाई देखणे ,श्याम सदाफुले, अजिजभाई शेख , सोनुबाई खुडे, नितीन गायकवाड हलिमा शेख ,,सुनील जाधव ,अरुण सोनावके,यादव हरणे,वैभव पवार ,विशाल कांबळे ,बाळासाहेब शिंदे ,निर्मला धेखने , मीना ठाकूर ,रवींद्र वाळके ,महादेव शिंदे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते .
