सांगलीत भाजपाकडून वीज बिले फाडुन केला निषेध : वीज बिल न भरण्याचे भाजपाकडून आवाहन
प्रतिनिधी , सांगली : लॉगडाऊन काळातील वीज बिले माफ करण्याबाबत शब्द फिरवणाऱ्या उर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सांगलीत भाजपाकडून करण्यात आली आहे. यावेळी लॉगडाऊन काळात आलेली वीज बिले फाडुन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी वीज बिल न भरण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात आले. भाजपा आमदार सुधीर गाडगीळ आणि युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी भाजपाकडून करण्यात आली. यावेळी खासगी वीज बिल फाडून ती हवेत उधळत राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. उर्जामंत्र्याचा निर्णय हा खासगी वीज कंपनीला पोसण्याचा प्रकार असल्याने ही वीज बिल कोणीही भरू नयेत असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले.
