प्रतिनिधी , नांदेड : देशातल्या व्यापारी संघटनांनी 26 फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे या संपाला वाहतूक संघटना छोटे दुकानदार आदींनी आधीच पाठिंबा दर्शवला आहे असून वस्तू आणि सेवा कराच्या गुड्स अंड सर्विस म्हणजेच जीएसटी च्या रचनेत फेरबदल करण्याच्या मागणीला जोर येण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता मात्र नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये या देशव्यापी बंदला प्रतिसाद मिळाला नाहीये आज दिवसभर बाजाराच्या निमित्ताने आपली दुकाने चालू ठेवली होती या देशव्यापी बंद संदर्भात व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांना विचारणा केली असता यांनी असे सांगितले आहे की इस्लापूर ही 62 खेड्याची एकमेव बाजारपेठेत आहे आणि आज शुक्रवार रोजी येथे बाजार भरतो त्यामुळे बाहेरून येणाऱ्या 62 गावच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आज आम्ही बंद पुकारलेला नाहीये त्यामुळे व्यापारी संघटनेची बैठक घेऊन आम्ही या बंदला पाठिंबा दर्शवून असे यावेळी सांगण्यात आले.
