जनतेज न्युज

शहरात क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी ,औरंगाबाद:-आज सोमवार 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योगा आणि किडा उपसंचालक औरंगाबाद विभागाच्यावतीने नाका ते छावणी परिसर पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यात उपसंचालक यांनी हिरवी झेंडी दाखवून सेकंड रॅलीचे उद्घाटन केले तर क्रीडा उपसंचालक औरंगाबाद विभागाच्यावतीने कारगील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले आहे आज शहरात कारगिल विजय दिनानिमित्ताने क्रीडा विभागाच्या वतीने शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी मोंढा नाका ते छावणी येथील स्मारकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील क्रांती चौक परिसरात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले यावेळी एनसीसीचे विद्यार्थी मानवंदना दिली तर अभिवादनाचा कार्यक्रम योगा स्पोर्ट्स असोशियन व क्रीडा उपसंचालक औरंगाबाद यांच्या वतीने साजरा करण्यात आला आहे या वेळी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले आहे,
यावेळी शहरातील नागरिकांसह लष्करी सेनेचे अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, क्रीडा विभागाचे शासकीय अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,
सदरील कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून यशस्वीरीत्या करण्यात आला आहे.