प्रतिनिधी , अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी काल अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सभा घेतली होती. यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षन मंत्री उदय सामंत आले होते मात्र याला परवानगी नसतांना कोविडच्या काळात त्यांनी प्रचार सभा घेतली मात्र इतर उमेदवाराला वेगळा न्याय व आम्हाला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करत शिक्षक उमेदवार संगीता शिंदे यांनी अमरावती विभागीय उपआयुक्त लहाने यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जो पर्यंत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचार संहिता भंग व कोविडच्या नियमा अंतर्गत गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत मी ठिय्या आंदोलन या विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू ठेवणार असे शिक्षक उमेदवार संगीता शिंदे यांनी सांगितले
