जनतेज न्युज

शिरपूर तालुक्यात वातावरणात अचानक बदलामुळे शेतकरी पुन्हा संकटात

प्रतिनिधी , शिरपूर : तालुक्यातील कालपासून ढगाळ वातावरण आहे.सोमवारी सकाळ पासून तर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बी पिके धोक्यात आले आहेत. तालुक्यातील 18 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेतीत गहू व हरभऱ्याची लागवड आहे.ढगाळ वातावरणामुळे गहू व हरभरा पिके धोक्यात आली आहेत.यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
या अगोदरही चार महिन्यांपूर्वी आलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा पार बेजार झाला आहे.