जनतेज न्युज

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई; 8 पिस्तूल घेऊन जाणाऱ्या संशयितांना केली अटक.

प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पंजाब येथील 3 संशयितांना मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमाभागा लगत 8 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतूसे यांच्यासह 15 ते 20 हजार रोख रक्कमसह अंदाजे एकूण 5 लाख 20 हजाराचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. या तिनही संशयितांना अटक करण्यात आली ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजेच्या सुमारास केली आहे.

पंजाब राज्यातून काही संशयित हे शस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या भागात आले असल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. पाटील यांनी लागलीच आपल्या पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरवात केली.

पोलीस पथकाने महाराष्ट्र मधप्रदेश सिमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असतांना चार वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजुकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची एक कार येतांना दिसली. त्या कारची तपासणी केली असतात त्या कार मधून 8 देशी पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे यांच्यासह 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे.