जनतेज न्युज

शिवसेनेचे आ. नितीन देशमुख मतदारसंघात परतले

प्रतिनिधी, अमरावती : शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करून ४० आमदार सोबत नेल्याचा दावा केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यात अकोला जिल्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख सोबत होते. ते मात्र मतदार संघात परतत असताना अमरावतीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी सूचक विधान केले. सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघात परत यावं. आम्ही उद्धव ठाकरे सोबत आहोत.असे वक्तव्य केले.