प्रतिनिधि , औरंगाबाद : शहरातील औरंगपुरा येथिल पिया मार्केट मध्ये रात्रीच्या सुमारास एक तरुण बार मधून जात असताना तिघांनी शुल्लक कारणावरून वाद घातला. हा वाद विकोपाला गेला यावेळी आरोपींनी तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या घडली.
समीर खान सिकंदर खान वय २७ रा.असेफिया कॉलनी असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, असेफिया कॉलनी येथील समीर गुरुवारी मध्यरात्री मित्रा सोबत पिया मार्केट येथील ओम साई लीला बारमधून पार्सल घेण्यासाठी गेला होता. बार मधून पार्सल घेऊन निघत असताना तिथे असलेल्या तीन तरुणांसोबत किरकोळ बाचाबाची झाली. समीरचा मित्र यावेळी मदतीला धावून आला.एका तरुणाने समीरच्या मांडीत धारदार शस्त्राने वार केला.या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.यावेळी मोमीन खान आमीर खान, समीर खान बाबर खान या दोघांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान डॉक्टरांनी समीरला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटिव्ही पोलिसांच्या ताब्यात…..
दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.या सीसीटिव्ही फुटेज वरून पोलिसांनी तीन संशित आरोपींना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहे.
