प्रतिनिधी , नंदुरबार : केंद्राने आणलेला शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात गेल्या महिन्यापासून दिल्ली येथे अदालत सुरू आहे . त्या आंदोलनाला पाठिंबा नंदुरबार येथून सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्ली येथे आदोलनला जाण्यापूर्वी शहरातील सर्व राष्ट्रपुरुषाना अभिवादन करण्यात आले, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गाँधी , पंडित नेहरू याना पुतळयाना पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले ,यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या .यावेळी दिल्ली साठी असंख्य कार्यकते रवाना झाले यात सत्यशोधक संघटनेचे सचिव विक्रम गावित , करनसिंग कोकणी, रणजीत गावित, नाना ठाकरे, अरुण रामराजे, जमनाबाई ठाकरे, दिलीप गावित , लीलाबाई वलवी, आर डी गावित, दिलीप गावित, शीतल गावित, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते..
