प्रतिनिधी , वाशीम: गरज ही शोधाजी जननी असे म्हणतात गरजच माणसाला नवनवीन पर्याय सुचविते असाच पर्याय शोधला आहे. वाशीम जिल्ह्यातील खडकी इजारा येथील देविदास गव्हाणे या शेतकरयाने, शेतात धरण झाल्यामुळे राहिलेल्या शेतात जाण्यास रस्ताच शिल्लक राहिला नाही. या गंभीर समस्येवर कुठल्याही प्रकारे सरकार दरबारी रडगाणे न मांडता स्वताच्या कल्पक बुद्धीच्या बळावर नामी प्रयोग शोधला आहे. 8 कि मी लांबीचा रस्ता पार करण्या ऐवजी शेतात जाने येणे करण्याकरिता 42 हजार रुपये खर्चून स्वताच होडी [ बोट ] घेतली आहे.
वाशीम जिल्ह्यातील खडकी येथील ज्ञानबा गव्हाणे कुटुंबाकडे 85 एकर शेती आहे. मात्र 65 एकर शेत धरणात गेल्याने 20 एकर शेती शिल्लक आहे. मात्र राहिलेल्या शेतात धरणामुळे रस्ता नसल्याने 8 कि मी अंतर कापून जाव लागत होत. त्यामुळे पूर्ण दिवस ये जा करण्यात जात होता मजूर ही शेतात कामासाठी येत नव्हते म्हणून ज्ञानबा गव्हाणे यांनी कायमस्वरूपी तोडगा काढायच ठरवील. आणी 42 हजार रुपये खर्च करून बोट तयार केली आहे.
2010 मध्ये खडकी येथील धरनाचे काम झाले त्यामुळं गावातील शेकडो एकर जमीन गेली आणी शिल्लक असलेली जमीन दुसरया काठावर असल्याने जमीन कसण कठीण झाले होत. मात्र आमच्या काकांनी बोट घेतल्यामुळे आम्हाला ही त्याचा फायदा होत असल्याचे त्यांचा पुतण्या सांगतो.
