जनतेज न्युज

श्री दत्त जयंतीनिमित्त सेठ गणूलाल धनुलाल दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी : पुणे , श्री दत्त जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील साचापीर स्ट्रीटवरील सेठ गणूलाल धनुलाल दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये अभिषेक , महापूजा व आरती करण्यात आली . सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा पार पडला . त्यानंतर राधा मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला .
यावेळी प्रेमलता राजोरे , गिरीधर राजोरे ,पंडित देवीप्रसाद जोशी , सुनील राजोरे , सुमिता गावडे , रोहित भागवत , गिरीराज शर्मा , मधू शर्मा , अनिता राजोरे , महेंद्र भोज आदी मान्यवर उपस्थित होते . दिवसभर मंदिरात दत्त भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त मंदिर समितीतर्फे होमहवन , सत्यनारायण महापूजा संपन्न
श्री दत्त जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील धोबीघाट कामगार वसाहती मधील श्री गुरुदेव दत्त मंदिर समितीतर्फे होमहवन , सत्यनारायण महापूजा संपन्न झाली . सायंकाळी दत्त भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे आयोजन विशाल चव्हाण , शुभम सारवान , निखिल भालेराव , शशिकांत चंडाले , यश खरारे , संजय जेधे आदींनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार मोहन जोशी व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी उपस्थित होते .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुकृपा दत्त मंदिरात होमहवन , पंचामृत अभिषेक , पूजा आरती आदी कार्यक्रम
श्री दत्त जयंतीनिमित्त शंकरसेठ रोडवरील पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमागे नव्या कालव्यावरील श्री गुरुकृपा दत्त मंदिरात होमहवन , पंचामृत अभिषेक , पूजा आरती आदी कार्यक्रम झाले . या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुकृपा दत्त मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने सत्यनारायण महापूजा , होमहवन , महाप्रसादाचे आयोजन
श्री दत्त जयंतीनिमित्त रास्ता पेठ येथील हॉटेल शांताईजवळील श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने सकाळी सत्यनारायण महापूजा , होमहवन , महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठल घोड , संदीप मांगडे , ज्ञानेश्वर गायकवाड , महेश नवघणे , संदीप शिंदे , उमेश जाधव , पपू जोगदेव व पप्पू अहिर यांनी केले होते . यावेळी नगरसेवक अरविंद शिंदे , शिवसेना समन्वयक अजय भोसले , नगरसेवक प्रशांत बधे व नगरसेवक उज्ज्वल केसकर उपस्थित होते .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्तगुरु माउली सेवा प्रतिष्ठानतर्फे श्री दत्त गुरु जन्म सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री दत्त जयंतीनिमित्त भवानी पेठमधील काशेवाडीमधील श्री दत्तगुरु माउली सेवा प्रतिष्ठानतर्फे श्री दत्त गुरु जन्म सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ पारायण , २४ तास अखंड नामस्मरण , अभिषेक , आरती , श्री दत्त याग , श्री दत्तजन्म सोहळा व महाआरती करण्यात आली . त्यानंतर दत्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिर समिती व हरकानगर फ्रेंड्स सर्कलतर्फे होमहवन , महाआरती , भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम
श्री दत्त जयंतीनिमित्त भवानी पेठ मधील हरकानगर येथील श्री दत्त मंदिर समिती व हरकानगर फ्रेंड्स सर्कलतर्फे होमहवन , महाआरती , भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाचे आयोजन हरकानगर फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष नीरज वाघेला , मिहीर वाघेला , वेदांत चव्हाण , दीपेश कंडारे , अक्षय वाघेला व अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .

श्री दत्त जयंतीनिमित्त दिगंबर मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने अभिषेक , होमहवन , आरती व महाप्रसादाचे आयोजन
श्री दत्त जयंतीनिमित्त भवानी पेठ मधील काशेवाडीमधील दिगंबर मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने अभिषेक , होमहवन , आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिगंबर मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय गुप्ता , आकाश भोसले , व मंडळाच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले .

श्री दत्त जयंतीनिमित्त पेशवेकालीन श्री दत्त मंदिरात लघुरुद्र , महापूजा , महाआरती , कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न
श्री दत्त जयंतीनिमित्त मंगळवार पेठमधील पेशवेकालीन श्री दत्त मंदिरात लघुरुद्र , महापूजा , महाआरती , कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी दत्त भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे आयोजन पेशवेकालीन श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश गोसावी , रोहित गोसावी , नंदा गोसावी , रेश्मा गोसावी , वृषाली गोसावी , स्नेहा गोसावी व सोमवार पेठ गोसावीपुरा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले .

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री सुर्यमुखी दत्त गणेश रामदरबार मंदिरात सार्वजनिक श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा
श्री दत्त जयंतीनिमित्त पुणे कॅम्पमधील क्वीन्स गार्डनमधील उत्तरा इमारतीमधील श्री सुर्यमुखी दत्त गणेश रामदरबार मंदिरात सार्वजनिक श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . यामध्ये अभिषेक , दत्तयाग , होमहवन , वेदमूर्ती पूजन , दत्तजन्म पाळणा सोहळा पार पडला . त्यानंतर दूध प्रसादाचा वाटप करण्यात आला . यावेळी दत्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . या कार्यक्रमाचे आयोजन अशोक सुसगोहेर , अरविंद सुसगोहेर , मेहेर इराणी व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते .