जनतेज न्युज

संगमनेर तालुक्यातील कुरकुंडू येथे शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी, अहमदनगर : आज तिथीनुसार शिवजयंतीचे सगळीकडेच आयोजन करण्यात आले आहे. यालाच अनुसरून संगमनेरच्या कुरकुंडी  गावात शिवप्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली असुन सर्व शिवभक्तांनी व तरूणांनी यात सहभाग घेतला.वीर जिजामाता प्रतिष्ठानकडुन  थेट शिवनेरी गडावरून जोत पेटवुन संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावात आणली आहे.प्रथम या शिवजोतीचे भव्य स्वागत गावकऱ्यांनी केले.त्यांनंतर शिप्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली.त्यानंतर शिवप्रतिमा व शिवज्योतीचे पुजन करण्यात आली व बालमनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व आखेरीस सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.